परभणी (Parbhani):- पैशाच्या कारणावरून एकाला चाकुने डोक्यात मारून जखमी करण्यात आले. रोख रक्कम तसेच अंगठी मिळून १ लाख ५ हजाराचा मुद्देमाल काढून घेण्यात आला. ही घटना १३ फेब्रुवारी रोजी रात्री ११ च्या सुमारास सेलू शहरातील पाथरी नाका येथे घडली. या प्रकरणी १४ फेब्रुवारीला सेलू पोलीसात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश वांडे यांनी तक्रार दिली आहे. आरोपींनी संगनमत करत फिर्यादीला महेश कलाडे यांना पैसे का मागतो या करणावरून चाकुने डोक्यात मारून जखमी केले. तसेच फिर्यादीजवळील रोख ५० हजार रुपये व एक अंगठी मिळून १ लाख ५ हजार रुपयाचा ऐवज बळजबरीने काढून घेतला. या प्रकरणी सुमीत साखरे, महेश कलाडे, बाबा व इतर एका अनोळखीवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोउपनि. पुरी करत आहेत.