परभणी (Parbhani):- जिल्ह्यात उन्हाचा वाढता पारा आणि निर्माण झालेल्या पाणीटंचाईने नागरीक त्रस्त झाले आहे. जिल्ह्यातील महत्वाचे प्रकल्प तळाला गेले आहेत. ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पूर्णा तालुक्यातील मौजे कमलापुर गावात जल जीवन मिशनचे(Jal Jeevan Mission) काम अर्धवट व बोगस केल्यामुळे महिलांना भर उन्हात पायपीट करावी लागत आहे. पाणीटंचाईने त्रस्त महिलांनी अखेर थेट ग्रामपंचायत कार्यालयावर बुधवार २९ मे रोजी घागरमोर्चा काढला. मोर्चा सहभागी महिला, अबालवृध्दांनी सरपंच, ग्रामसेवक यांना जाब विचारला.
ग्रामपंचायत कार्यालयाकडे वेळोवेळी पाणी टंचाई विषयी समस्या मांडली
सध्या मे महिन्याच्या शेवटी सुर्य अक्षरश: आग ओकत असून ग्रामस्थांना तीव्र उन्हा बरोबरच पाण्याच्या समस्येला देखील सामोरे जावे लागत आहे. या विषयी ग्रामपंचायत कार्यालयाकडे वेळोवेळी पाणी टंचाई (Water shortage)विषयी समस्या मांडली असता कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर संतप्त झालेल्या महिला, लहान मुलांसह ग्रामस्थांनी बुधवार २९ मे रोजी सकळी अकरा वाजता हातात रिकाम्या घागरी घेवून थेट ग्रामपंचायत (Gram Panchayat)कार्यालयात घागर मोर्चा काढला. या ठिकाणी ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासनाला समस्यांविषयी जाब विचारला असता नेहमी प्रमाणे उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली.