परभणी/गंगाखेड (Parbhani Accident ) : तालुक्यातील माखणी शिवारात मासोळी प्रकल्पातील गाळ उपसा करणाऱ्या हायवा वाहनाखाली सापडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू (Gangakhed crime) झाल्याची घटना दुपारी २:३० वाजेच्या सुमारास घडली आहे.
गंगाखेड तालुक्यातील माखणी शिवारातील घटना
माहितीनुसार, गंगाखेड तालुक्यातील माखणी शिवारात आसलेल्या मासोळी प्रकल्पातील गाळ उपसा करण्याचे काम सुरू असून गाळ उपसा करण्यासाठी आलेल्या हायवा वाहनचा चालक रवि साहेबराव बेले याने त्याच्या ताब्यातील वाहन हायगाय व निष्काळजीपणे जोरात मागे घेतला असता पाठीमागे असलेल्या शिवराज पंडीत दिंडे वय १६ वर्ष राहणार पोखर्णी नृसिंह ता. परभणी यास धक्का लागून तो खाली पडला व हायवाच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी होऊन निपचित पडला. शिवराज दिंडे याचे मामा रखमाजी बालासाहेब बेले यांनी त्यास सायंकाळी ६:५० वाजेच्या सुमारास उपचारासाठी (Gangakhed Hospital) गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल
निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिंक्य मुळे यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. सदर घटनेची माहिती मिळताच (Parbhani Police) पोलीस उपनिरीक्षक संदीप गडदे, जमादार सुंदरराव शहाणे यांनी पंचनामा करून मृतदेह (Gangakhed Hospital) उपजिल्हा रुग्णालयातील शवगृहात ठेवला. दिनांक ८ मे बुधवार रोजी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी रखमाजी बालासाहेब बेले राहणार पोखर्णी नृसिंह ता. परभणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहन चालक रवि साहेबराव बेले राहणार पोखर्णी नृसिंह ता. परभणी याच्या विरुद्ध अपघात करून शिवराज दिंडे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास (Gangakhed Police) पोलीस उपनिरीक्षक संदीप गडदे हे करीत आहेत.