परभणी/ताडकळस (Parbhani Accident) : येथील पोलीस ठाणे हद्दितील मौजे तट्टुजवळा येथील ओंकार गणेश कदम वय २० वर्ष हा युवक शुक्रवार २१ जून रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक एम.एच. २२ ए. झेड. ४०८१ ने तट्टुजवळा पाटी ते मिरखेलकडे जात असताना अचानक झालेल्या दुचाकी (Parbhani Accident) अपघातात जखमी झाला. त्याला तात्काळ परभणी येथील एका खाजगी रुग्णालयात (Parbhani Hospital) दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान रात्री एक ते दोन वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई – वडिल, एक बहिण असा परिवार असून या प्रकरणी (Parbhani police) ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. युवकाचा अपघाती निधनानंतर गावात शोकाकुल वातावरण आहे