झरी ते बोरी रोडवरील घटना; ग्रामीण पोलिसात गुन्हा
परभणी (Parbhani Accident) : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. ही (Parbhani Accident) घटना बुधवार ७ ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजता झरी ते बोरी रस्त्यावर माक पाटी येथे घडली. या प्रकरणी परभणी ग्रामीण पोलिसात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव सखाराम घाटूळ यांनी तक्रार दिली आहे. अपघातात सखाराम धोंडिबा घाटुळ वय ४० वर्ष यांचा मृत्यू झाला आहे.
सखाराम हे आपल्या दुचाकीने परभणी येथून बोरीला जात असताना माक पाटी जवळ अज्ञात वाहनाने (Parbhani Accident) त्यांना धडक दिली. जखमीला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास सपोनि. विक्रल हराळे करत आहेत.
दहा वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू
गंगाखेड तालुक्यातील हरंगुळ ते खातगाव रोडवर गुरुवार ८ ऑगस्ट रोजी सकळी अकराच्या सुमारास झालेल्या (Parbhani Accident) अपघातात एका दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या अपघाताविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की, अफरोज ताज खाँ पठाण वय १० वर्ष असे मयत मुलाचे नाव आहे. हरंगुळ येथे जत्रेला जात असताना अनोळखी वाहनाने मुलाला धडक दिली. त्याला उपचारासाठी गंगाखेड येथील उप जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथून परभणीला हलविण्यात आले. मात्र मुलाचा मृत्यू झाला. सदर प्रकरणी गंगाखेड पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.