परभणी/एरंडेश्वर (Parbhani accident) : हॉटेल मध्ये चहा पिऊन रस्त्यावर दुचाकीजवळ उभ्या असलेल्या दोघांना भरधाव वेगातील आयशरने उडविले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना शनिवार १९ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास परभणी – वसमत रस्त्यावर झिरोफाटा जवळ घडली. अपघातातील आयशर वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या घटने विषयी अधिक माहिती अशी की, तुकाराम बबनराव कदम (वय ३० वर्ष, रा. एरंडेश्वर) असे मयताचे नाव आहे. अपघातात अविनाश रावसाहेब कदम हे जखमी झाले असून त्यांच्यावर परभणी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघाताची माहिती मिळताच पूर्णा पोलिस ठाण्याचे पो.नि. घोबाळे, पोलिस अंमलदार एस.बी. काळे, जुकटे, चौरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत तुकाराम कदम यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
दुभाजकाला धडकुन दुचाकी चालकाचा मृत्यू
परभणी : भरधाव वेगात दुचाकी चालवुन दुभाजकाला धडकल्याने जखमी होऊन एकाचा मृत्यू झाला. ही घटना परभणी – गंगाखेड रोडवर ब्राम्हणगाव शिवारात १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली. काशिनाथ भयनाजी भोळे असे मयताचे नाव आहे. पंडीत भोळे यांच्या खबरीवरुन परभणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि. गडदे करत आहेत.