परभणी शहरातील घटना
परभणी (Parbhani Accident) : शहरातील उड्डाणपुलावर (flyover) आज दुपारी पावणे चारच्या सुमारास झालेल्या बस- दुचाकी (Parbhani Accident) अपघातात एकाचा मृत्यू झाला. उड्डाणपुलावर अपघात झाल्याने वाहतुकीची कोंडी झाली.
अपघातानंतर उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी
या (Parbhani Accident) अपघाताविषयी अधिक माहिती अशी की, अंबेजोगाईवरुन गेवराईकडे जात असलेली एम.एच. १४ बी.टी. २१८५ ही बस परभणी शहरातील उड्डाणपुलावरुन बसस्थानकाकडे जात होती. यावेळी एम.एम. २२ वाय २८२५ या क्रमांकाच्या दुचाकी सोबत अपघात झाला. दुचाकी चालक बसखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच (Parbhani Police) कोतवाली पोलीस ठाण्याचे पोनि. ननवरे, पोलीस अंमलदार पवन निळेकर, गजानन दुधाटे, सम्राट कोरडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. मृतदेहाची तपासणी केली असता मयताजवळ मोबाईलची एक पावती मिळाली आहे. या पावतीवर महेश गौरकर असे नाव असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. मयताच्या नातेवाईकांचा शोध घेतला जात आहे.