परभणीच्या दैठणा बसस्थानकाजवळ अपघात
परभणी/दैठणा (Parbhani Accident) : परभणी – गंगाखेड महामार्गावर दैठणा येथील (parbhani Bus Stand) बसस्थानकाजवळ बोलेरो पिकअप- हायवा – बस या तीन वाहनांमध्ये विचित्र अपघात झाला. ही घटना गुरुवार १३ जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने या (Parbhani Accident) अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बोलेरो पिकअप चालक जखमी झाला. गंगाखेड – परभणी महामार्गावर दैठणा येथे महाराणा प्रताप चौक या ठिकाणी अपघात झाला.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, बोलेरो पिकअप चालक जखमी
गंगाखेडकडून विटा घेवून येणारा टिप्पर आणि परभणीकडून विद्युत रोहित्र घेऊन गंगाखेडकडे जाणार्या पिकअपमध्ये (Parbhani Accident) अपघात झाला. समोरा समोर धडक झाल्याने पिकअप वाहन बाजूला उभ्या असलेल्या एसटीवर आदळले. यात एसटीचे नुकसान झाले. पावसात झालेल्या या अपघातामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या. अपघाताची माहिती मिळताच दैठणा (parbhani police) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. (Parbhani Accident) अपघातात पिकअप चालक गोविंद मेटेवाड जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी (parbhani Hospital) रुग्णालयात पाठविण्यात आले. सायंकाळी उशीरापर्यंत या अपघाताविषयी नोंद झाली नव्हती.