परभणी/ताडकळस (Parbhani Accident) : येथुन जवळच असलेल्या ताडकळस -पालम रस्त्यावरील कळगाववाडी पाटीजवळ अँपे अँटो व मोटारसायकलचा (Parbhani Accident) अपघात होऊन पालम येथील एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी ४ ते ५ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेतील जखमीला ताडकळस येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी (Nanded Hospital) नांदेड येथे पाठविले आहे. घटना घडताच घटनास्थळावरून अँटो चालक फरार झाला आहे.
परभणीच्या ताडकळस-पालम रस्त्यावर अपघात
माहितीनुसार, ताडकळस ते पालम या रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढली आहे. तसेच (Parbhani Accident) सुसाट वेगाने वाहने जात असल्याने एक प्रकारे हा रस्ता मृत्युचा सापळा बनला आहे. गुरुवार १६ मे रोजी सायंकाळी ४ ते ५ वाजेच्या दरम्यान ताडकळस येथुन पालम येथील रहिवासी असलेला व मोबाईलच्या एअरटेअल कंपनीचे सिम कार्ड वितरणचे काम करणारा सय्यद मुद्देसीर सय्यद जुल्फेकार वय २९ वर्षे हा तरुण व त्याच्या सोबत अलि चाऊस वय ३१ वर्षे हे दोघे जण मोटारसायकल क्रमांक एम. एच.२२ ए .एक्स.९३१३ या दुचाकीवरून पालमकडे जात होते.
जखमीला नांदेड येथे उपचारासाठी दाखल
याच वेळी याच रस्त्यावरून ताडकळस येथुन कळगावकडे अँपे अँटो ( छोटा हत्ती) क्रमांक एम.एच.१३ ए.एक्स. ८०६९ हा जात होता. हे दोन्ही वाहने कळगाववाडी पाटीजवळ आले असता अपघात झाला. या (Parbhani Accident) अपघातात दुचाकीवरील सय्यद मुद्देसीर हे जागीच ठार झाले तर सोबत असलेला अलि चाऊस हे जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच (Parbhani Police) सपोनि कपिल शेळके यांनी घटनास्थळी धाव घेतली. ताडकळस प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी मयताचे पार्थिव देह आणला असुन पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.