परभणी- जिंतूर रोडवरील नांदापूर जवळील घटना
परभणी (Parbhani Accident) : तालुक्यातील परभणी-जिंतूर रोडवर नांदापूर ते टाकळी कुंभकर्ण दरम्यान झालेल्या (Parbhani Accident) अपघातात एका ३३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवार १९ मे रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. सदर अपघाताबाबत (Parbhani Police) पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजू लक्ष्मणराव पावटे वय ३३ वर्ष रा. नेहरूनगर जिंतूर रोड परभणी, असे मयताचे नाव आहे. राजू पावटे हा दुचाकीने येत असताना नांदापूर ते टाकळी कुंभकर्ण दरम्यान त्याचा अपघाती मृत्यू झाला. (Parbhani Accident) नेमका अपघात कसा झाला, याविषयी अधिक माहिती मिळू शकली नाही.
अज्ञात वाहनाच्या धडकेत राजू पावटे याचा मृत्यू झाला असेल, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच (Parbhani Police) परभणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुट्टे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हराळे, पोलीस अमलदार कादरी यांनी घटनास्थळी भेट दिली. मयतावर परभणी येथील (Parbhani Hospital) जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मयताच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे. सदर घटने प्रकरणी परभणी पोलिसात सोमवार दुपारपर्यंत नोंद झाली नव्हती.