परभणीतील लोहगाव शिवारातील घटना
ताडकळस पोलिसात गुन्हा दाखल
परभणी/ताडकळस (Parbhani Accidents) : भरधाव वेगातील ट्रकने छोटाहत्ती वाहनाला जोराची धडक दिली. यात वाहन चालकाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना २६ जानेवारीच्या रात्री साडे सातच्या सुमारास लोहगाव ते दस्तापुर कॅनल जवळ लोहगाव शिवारात घडली. सदर प्रकरणी ट्रक चालकावर ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विठ्ठलराव केशवराव चाळक यांनी तक्रार दिली आहे. (Parbhani Accidents) अपघातात फिर्यादीचा मुलगा जगन्नाथ चाळक वय३५ वर्ष हा मयत झाला. २६ जानेवारीच्या रात्री जगन्नाथ चाळक हे एम.एच. ०१ एल.ए. ९६०५ या क्रमांकाचा छोटाहत्ती वाहन चालवत होते. त्यांच्या गाडीला एम.एच. १६ सी.सी. ३३०३ या क्रमांकाच्या ट्रक चालकाने भरधाव वेगात धडक दिली. अपघातात जगन्नाथ चाळक गंभीर जखमी होऊन मयत झाले. ताडकळस पोलिसा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोउपनि. लोंढे करत आहेत.
पान्हेरा पाटी जवळ अपघात
परभणी : पाथरी रस्त्यावरील पान्हेरा पाटी जवळ एक चारचाकी आणि दुचाकीत सोमवार २७ जानेवारी रोजी अपघात झाला. (Parbhani Accidents) अपघातात दुचाकी चालक योगेश गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चारचाकी चालक मानवत तालुक्यातील भोसा येथील असल्याची माहिती मिळाली आहे.