परभणी (Parbhani):- शहरात चोरी करून मागील दहा वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हा शाखा, नक्षल सेलच्या (Naxal cell)पथकाने बुलढाणा जिल्ह्यातून ताब्यात घेतले.
सेलच्या पथकाची कारवाई
पोलीस अधिक्षक यांच्या आदेशाने फरारी व पाहिजे असलेल्या आरोपींच्या शोधासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. याच मोहिमेत नानलपेठ पोलीस ठाण्यात सन २०१४ दाखल असलेल्या चोरीतील गुन्ह्यामधील आरोपी नंदू उर्फ नंदकिशोर उर्फ धर्मा अशोक वानखेडे याला बुलढाणा येथून ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोनि अशोक घोरबांड, पोलीस अंमलदार मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश परसोडे यांच्या पथकाने केली.