परभणीच्या आनंद नगर वासीयांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
परभणी (Parbhani Andolan) : येथील रेल्वे स्टेशनच्या बाजुला असलेली आनंद नगर ही वसाहत हटविण्याचा घाट घातल्या जात आहे. या विरोधात आनंद नगर वासीयांनी आज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Parbhani Andolan) धरणे आंदोलन केले. रेल्वे स्थानकाच्या बाजुला असलेली ही वसाहत जवळपास शंभर वर्ष जुनी आहे. या ठिकाणी शेतकरी, शेतमजुर, हमाल, मजदुर वर्ग राहण्यास आहे. (Municipality) महापालीकेने सदर ठिकणी आवश्यक नागरी सुविधा पुर्वील्या आहेत. असे असतांना रेल्वे प्रशासनाने जिल्हाधिकारी (Parbhani Collector) यांना पत्र देवून आनंद नगर येथील घरांसाठी झालेले अतीक्रमण हटवून मोकळी झालेली जागा रेल्वे प्रशासनाच्या स्वाधीन करावी, असे नमुद केले आहे. (Parbhani NMC) महापालीका आयुक्तांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
झोपडपट्टी हटविण्यासाठी सुरु असलेली कारवाई थांबविण्याची मागणी
या कारवाईमुळे आनंद नगरातील रहिवासी भयभित झाले आहेत. येथील नगरीकांनी आपले म्हणने प्रशासनासमोर मांडण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Parbhani Andolan) धरणे आंदोलन केले. यानंतर प्रशासनाला निवेदन सादर केले. निवेदनावर नागेश सोनपसारे, जयश्री खोबे, शामराव खोबे, विश्वनाथ गवारे, कॉ.गणपत भिसे, भगवान भालेराव, लक्ष्मण साळवे, रोहन चव्हाण, आरतीबाई वाकुडे, लताबाई रगडे, विजय वाकुडे, चंद्रकला कांबळे, शत्रुघ्न जगतकर, रुस्तुम पारधे, बन्सी वाकुडे, शेख युनुस, देवीदास घोडके यांच्या स्वाक्षर्या आहेत.