शिवसेना उबाठा महिला आघाडीचा इशारा
परभणी (Parbhani Andolan) : शहरातील रस्ते, स्वच्छता, धुळ, पाणी पुरवठा, आदि समस्यांना (Municipal Corporation) महानगर पालीका आयुक्त जबाबदार असून त्यांची आठ दिवसात बदली न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या दालनात आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शिवसेना उबाठा महिला आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेत दिला. शहरातील राधीका पॅलेस येथे आज गुरुवार शिवसेना उबाठा महिला आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या अंबीका डहाळे यांनी मनपा आयुक्तावर टिका करताना म्हणाल्या की, आयुक्तांनी अनावश्यक ठिकाणी खर्च करण्या पेक्षा रस्त्यातील खड्डे बजविणे, स्वच्छता, घंटागाडी, पाणी पुरवठा या मुलभुत सुविधांवर भर देणे आवश्यक होते मात्र तसे होतांना दिसत नाही. त्या सरकारमधील बड्या व्यक्तींच्या नातेवाईक असल्याने त्यांना अभय मिळत आहे. यावेळी महिला आघाडीच्या द्रोपदी जावळे, वंदना कदम, कविता नांदुरे, उषा मुंडे, संगिता टेहरे, सुनिता कांबळे, वैशाली खांडे, किर्ती चौधरी, कांचन राठोड, मिरा कवाळे, सुनिता गिरी, अर्चना जाधव यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री ठाकरे असतांना आ.पाटील यांनी निधी आणला
पत्रकार परिषदेत शहरातील एक वृत्त पत्रात दिलेल्या जाहीरातीवर टिका करतांना डहाळे म्हणाल्या की,बस पोर्ट, तारांगण, रस्त्यांसाठी निधी, जेष्ठ नागरीक मंच, अंतर्गतरस्त्यांसाठी आ.डॉ.राहुल पाटील यांनी निधी आणला असून ती कामे शेवटच्या टप्प्यात आहेत. लवकरच बस पोर्टचे उद्घाटन होईल. आमदार – खासदारांनी गद्दार गटात प्रवेश न केल्याने बदणामी करण्यात येत आहे. अशे यावेळी त्यांनी सांगितले.