स्वातंत्र्यापासून आजपर्यंत नाही झाला डांबरी रस्ता
परभणी (Parbhani Andolan) : तालुक्यातील सुकापूरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची (Zilla Parishad) इमारत मोडकळीस आली असून त्यामुळे वर्ग व्हरांड्यात भरवावे लागत आहेत आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत सुकापूरवाडी येथे जाण्यासाठी रस्ता नसल्याने विद्यार्थी व नागरीकांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात ठिय्या (Parbhani Andolan) देत मागण्या तात्काळ सोडविण्याची मागणी केली.
जिर्ण शाळा इमारतीमुळे व्हरांड्यात भरतात वर्ग
सुकापूरवाडी येथे इयत्ता चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची (Zilla Parishad) शाळा असून शाळेत ३० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना बसण्यासाठी इमारत जिर्ण झाल्याने व्हरांड्यात वर्ग भरवावे लागत आहेत. तसेच शिकविण्यासाठी एकच शिक्षक आहे. दुसरा शिक्षक तात्काळ द्यावा आणि गावाला जाण्यासाठी डांबर रस्ता करावा या मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. गावात रस्ता नसल्याने तातडीची वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने आजपर्यंत दोन जणांना प्राण गमवावे लागल्याचे निवेदनात म्हटले आहे. पुढील पंधरा दिवसात रस्ता व शाळा इमारत आणि शिक्षकाचा प्रश्न न सोडविल्यास गावकर्यांनी (Parbhani Andolan) आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
यावेळी संदीप कदम, विष्णू कदम, भरत कदम, राजेश कदम, अंकुश कदम, भागवत कदम, सखाराम कदम, पंढरी कदम, सदाशिव कदम, आत्माराम कदम, विठ्ठल कदम, ज्ञानोबा कदम, भागवत कदम, गोविंद कदम, अनिल कदम, दिपक कदम, अर्जुन कदम, दत्ता कदम व संतोष कदम आदींसहीत विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
विद्यार्थी, नागरीकांनी दणाणून सोडली जिल्हा परिषद
सुकापूरवाडी येथील शाळेत ३० विद्यार्थी शिक्षण घेत असून एकच शिक्षक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे व गावातून शहरात ये – जा करण्यासाठी रस्ता तात्काळ करावा या मागणीसाठी सीईओंच्या दालनात विद्यार्थी, नागरीकांनी ठिय्या देत घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या संदर्भात दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान सीईओ खांडेकर यांनी शिष्टमंडळास भेटीस पाचारण केले. या विषयी (Zilla Parishad) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांच्याशी संपर्क केला असता त्या ऑनलाईन मिटींगमध्ये असल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.