शहरातील दुरावस्था झालेल्या रस्त्यांची काढण्यात येणार होती प्रतिकात्मक अंत्ययात्रा
परभणी (Parbhani Andolan) : शहरातील दुरावस्था झालेल्या रस्त्यांची (symbolic funeral) प्रतिकात्मक अंत्ययात्रा रविवार १४ जुलै रोजी आम आदमी पार्टीच्या वतीने काढण्यात येणार होती. मात्र (Parbhani Andolan) आंदोलनापुर्वीच लोकशाही पध्दतीने जनतेचे प्रश्न मांडणार्या आपच्या जिल्हाध्यक्ष सतिष चकोर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांना नवा मोंढा पोलीसांनी जबरदस्तीने अटक केली आहे.
परभणीची अवस्था बकाल झाली असून जागोजागी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे परभणीत खड्डे की, खड्ड्यात परभणी म्हणण्याची वेळ नागरीकांवर आली आहे. त्यातच शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात कचर्यांचे ढिग पडले असून परभणीकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ना प्रशासनाला, ना इथल्या लोकप्रतिनिधींना कोणत्याही प्रश्नाचे गांभीर्य राहिले नाही. दिवसेंदिवस एक – एक प्रश्न जनतेसमोर उभे राहत आहे. या रस्त्यांच्या गंभीर प्रश्नांवर आम आदमी पार्टीच्या वतीने खानापूर फाटा ते उघडा महादेव, खंडोबा बाजार, शनिवार बाजार, गणपती चौक मार्गे जिंतूर रोडवरील कॅनलपर्यंत रविवार १४ जुलै रोजी सकाळी १० वाजता रस्त्यांच्या प्रतिकात्मक अंत्ययात्रेचे (symbolic funeral) आयोजन करण्यात आले होते. मात्र पोलीसांनी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सतिष चकोर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांना जबरदस्तीने अटक केले. (Parbhani Andolan) त्यामुळे लोकशाही पध्दतीने जनतेच्या प्रश्नांवर बोलणार्यांचा आवाज दाबला जात आहे.