परभणी(Parbhani):- दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी परभणी शहरातील प्रसिद्ध खंडोबा मंदीरात (Khandoba Temple) आज पासून पारंपरिक पध्द्तीने महापूजा करून यात्रेस प्रारंभ झाला. मानाची श्री ची पूजा परभणी चे जिल्हाधिकारी रंगुनाथ गावडे यांच्या हस्ते करण्यात आली व परभणी महानगरपालिकाचे आयुक्त यांनी सुद्धा आपली हजेरी लावत श्री ची पूजा केली.
खंडोबा कॉर्नर परिसरात भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती
यावेळी यात्रा समितीकडून मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे परभणी महानगरपालिकाचे आयुक्त धैर्यशील जाधव परभणी तहसीलदार राजुरकर मारुती मामा बनसोडे सुनील बाबा देशमुख अण्णा डिगोळे अनंतराव बनसोडे बबनराव बनसोडे सुरेश चांदणे गणेश मुळे सुदर्शन बनसोडे राजेश बालटकर आबा खुने अंकुश खुने व खंडोबा मंदिराची पुजारी रवी यांची उपस्थिती होती, तसेच दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेत शनिवारी जंगी कुस्त्यांची दंगल आयोजन यात्रा कमिटीतर्फे ठेवण्यात आला असून लाखोंची बक्षिसे सुद्धा देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.