घशाची तहान भागविण्याकरीता प्राण्यांची शहाराकडे धाव
परभणी/जिंतूर (Parbhani) :- येथील वन विभागच्या वतीने तयार करण्यात आलेले पाणवठे उन्हाच्या तीव्रतेमुळे पूर्णतः आटले आहे.परिणामस्वरूप वन्यजीव प्राण्यांना घशाची तहान भागविण्यासाठी शहराकडे धाव घ्यावी लागत आहे परिणामी बहुसंख्य वन्य प्राणी (wild animals) रस्त्यावर येऊन अपघात ग्रस्त होत आहेत. मात्र वन्य विभागाचा पाणी पुरवठा केवळ कागदोपत्री आहे म्हणून या गंभीर समस्ये कडे वन उपसवरक्षन कार्यालयाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
वन्य विभागाचा पाणीपुरवठा केवळ कागदोपत्री
तालुक्यातील इटोली, दाभा, दिग्रस, सावरगाव, गारखेडा, कुऱ्हाडी,भोसी, धमधम,वझर, धानोरा,कावी, आदी ठिकाणी घनदाट जंगले असल्याने या भागात काळवीट, हरीण, कोल्हा, लांडगा, मोर, रोही, वानर, रानडुकर, ससा आदी वन्य प्राणी मोठ्या संख्येने वास्तव्य करत असतात म्हणून वन्य विभागाचा वतीने इतक्या भागातील वन्य प्राण्याची तहान भागविण्या करीता नाममात्र पाणवठे तयार करण्यात आले आहे. या पानवठ्यामध्ये प्राण्यांसाठी नियमितपणे पाणी राहावे यासाठी वन विभागाच्या (Forest Department) वतीने हजारोंच्या घरात निधी उपलब्ध करून देण्यात येत असते पण वन अधिकारी स्वतः च्या तुंबड्या भरून घेण्या करीता सदरील पानवठ्या मध्ये कागदोपत्री पाणी पुरवठा करीत आहेत एरवी तालुक्यातील तलाव, नाले, ओढे, बंधारे आदी जल स्रोतांतून प्राणी तहान भागवतात परंतु फेब्रुवारी महिन्या पर्यंत सदरील जलस्रोत तळ गाठतात म्हणून वन्यजीव प्राणी पाण्याच्या शोधार्थ गावाकडे तसेच रस्त्यावर येतात फलस्वरूप रस्त्यावर आलेल्या प्राण्याना वाहनापासून अपघातग्रस्त (Accident victim) होऊन आपले जीव गमवावे लागत असल्याचे उदाहरण सर्व परिचीत आहे.
वनरक्षकच वन्य प्राण्याचे भक्षक बनले आहे
वनरक्षकच वन्य प्राण्याचे भक्षक बनले आहे हे सांगितले तर वावगे ठरणार नाही कारण वन्य प्राण्यांना जगविण्यासाठी दिलेल्या निधी वन अधिकारी स्वतः चा स्वार्था साठी वापरात असून तालुक्यातील नाममात्र पानवठ्या मध्ये पाणी पुरवठा करणे ही दुरापास्त होऊन बसले आहे कारण वन अधिकारी पानवठ्यातील पाणी पुरवठा केवळ कागदोपत्री करीत असल्याने वन्य जीवांची पाण्यासाठी चांगलीच दैना होत आहे. परिणामी वन्य प्राण्यांना घशाची तहान भागविण्या करिता मोठ्या प्रमाणात भटकंती करावी लागत आहे कारण उन्हाळ्यात वन्यजीवांना पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागते.यंदाचे चित्र विदारक आहे.वन्यप्राण्यांसाठीही टंचाई निवारण आराखडा तयार करून नवीन पाणवठे निर्माण करण्याची गरज आहे. मात्र जिंतूरमधील असलेल्या पणवठ्याची अत्यंत दुर्दशा झालेली आहे. म्हणून मुक्या जनावरांच्या घशातील पाण्यात भ्रष्टाचार करणाऱ्या वन अधिकाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे.