परभणी विधानसभे चे आ. डॉ. पाटील यांनी केली मागणी
परभणी (Parbhani Assembly) : शहरातून जाणार्या गंगाखेड, पाथरी, जिंतुर राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ठ कामाचे वाभाडे आ. डॉ. राहुल पाटील यांनी विधानसभा अधिवेशनात गुरुवार १० जुलै रोजी काढले. परभणी ते गंगाखेड या राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट झाले आहे. त्यामुळे जागोजागी रस्ता उखडला आहे. सिमेंट रस्त्याला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे सातत्याने अपघात होऊन शेकडो जणांचे बळी गेले आहेत. या बोगस कामाची चौकशी करुन ताक्ताळ कारवाई करा, तसेच हे काम नव्याने करा, अशी मागणी आ.डॉ. राहूल पाटील (Dr. Rahul Patil) अधिवेशनात केली.
महामार्गाच्या कामाच्या चौकशी
विधानसभा अधिवेशात आ. डॉ. राहुल पाटील (Dr. Rahul Patil) यांनी जिल्ह्यातील रखडेलेल्या रस्त्यावरुन संताप व्यक्त केला. यावेळी बोलताना आ. डॉ. पाटील (Dr. Rahul Patil) म्हणाले, त्यासोबत जिंतुर रस्त्याचे काम अनेक वर्षापासून रखडले आहे. १ किलोमिटर काम महावितरणच्या खांबामुळे रखडल्याचे सांगितले होते. परंतु आपण महावितरणला सांगुन तो अडथळा दुर केला आहे. परंतु आता (Construction Department) बांधकाम विभागाचे अभियंता कंत्राटदाराकडे निधी नसल्याचे अजब उत्तर देत आहेत. हा खेळखंडोबा थांबवा संबधीत अधिकारी यांच्यावर कारवाई करा अशी मागणी केली, तसेच पाथरी रस्त्याचे उर्वरीत काम कधी पूर्ण करणार असा प्रश्न उपस्थित केला. रस्ते कामात मोठा भ्रष्टाचार सुरु असुन एकप्रकारे कंत्राटदार अधिकारी यांची साखळी तयार होऊन ठरवून केलेला सामुहीक भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप आ. डॉ. पाटील (Dr. Rahul Patil) यांनी केला.
बांधकाम मंत्री ना. चव्हाण यांनी दिलेले उत्तर
आ. डॉ. पाटील (Dr. Rahul Patil) यांचे म्हणणे योग्य आहे,त्यांनी केलेले आरोप खरे आहेत. गंगाखेड रस्त्याच्या कामात निकृष्ठ पणा झाला आहे. २०१८ मध्ये हे काम सुरु झाले होते. पुढे कोरोनामुळे काम थांबले होते. पावसाळ्यात काम सुरु झाल्यानंतर काळीमाती असल्याने पाण्याचा निचरा न झाल्याने या रस्त्यावर २१०० भेगा पडल्या आहेत, हे खरे आहे. अत्यंत घाईघाईत हे काम झाल्याने मंत्री चव्हाण यांनी मान्य केले. आता याचे ऑडीट झाले असून मॅट व आयआयटीच्या वतीने हा रस्ता सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे. तर जिंतुर रस्ता संदर्भात येत्या १५ दिवसात संबधीत अधिकारी, कंत्राटदार यांची बैठक घेऊन काम सुरु करु, असे आश्वासन दिले.
मुंबई येथे महावितरणच्या संचालक काची घेतली भेट
परभणी : मुंबई येथे महावितरणच्या मुख्य कार्यालयात परभणी मतदार संघातील वीजप्रश्नावर आ. डॉ. राहूल पाटील (Dr. Rahul Patil) यांनी संचालक भादेकर यांची भेट घेऊन चर्चा केली.