परभणी (Parbhani Assembly Election) : राज्यामध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ निवडणूक कार्यक्रम घोषित झाला असून निवडणूक आयोगाच्या वतीने सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत असून मतदानाचा टक्का वाढावा याकरिता सुद्धा वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून नगरपरिषद मानवत च्या वतीने वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन श्रीमती कोमल सावरे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद मानवत यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाचा टक्का वाढावा समाजातील सर्व घटकापर्यंत मतदानाची जनजागृती व्हावी व त्यांनी मतदानाचा हक्क बजावा याकरिता वेगवेगळे उपक्रम आयोजित करण्यात येत आहे.
सध्या संपूर्ण देशामध्ये दीपावली पर्वाचे आगमन झाले आहे. दीपावली सणाच्या माध्यमातून सुद्धा नगर परिषदेच्या वतीने मतदान जनजागृती करण्यात आली आहे. एक दिवा मतदानासाठी या (Parbhani Assembly Election) उपक्रमाचे आयोजन नगरपरिषद मानवत च्या वतीने करण्यात आले होते. यासाठी आनंद नांदगावकर यांच्या पुढाकाराने नगरपरिषदेच्या आवारामध्ये एक दिवा मतदानासाठी ही जनजागृती पर रांगोळी साकारण्यात आली होती. याच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकातील लोकांनी मतदान करून लोकशाही वृद्धिंगत व बळकट करावी. हा संदेश देण्यात आला. यावेळी उपस्थित कोमल सावरे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद मानवत यांनी सर्व शहरवासीयांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या तसेच मतदानासाठी सर्व नागरिकांनी पुढाकार घेऊन सर्व स्तरातील मतदार राजाने आपले मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन केले.
यावेळी (Parbhani Assembly Election) परभणीच्या मानवत नगर परिषद अधिकारी कर्मचारी अभियंता सय्यद अन्वर, महेश कदम, भगवानराव शिंदे, काशिनाथ धुळगुंडे, रामराव चव्हाण, भारत पवार,राजेश शर्मा, विनय आडसकर, शतानिक जोशी, संतोष खरात, अजय उडते, संतोष उन्हाळे, हनुमंत बिडवे, मुंजाभाऊ गवारे, संजय रुद्रवार, दीपक सातभाई, मनमोहन बारहाते, भगवानराव बारटक्के, रवि दहे, पंकज पवार, सचिन सोनवणे, नारायण व्यवहारे, वसीम शेख, वंदना इंगोले, मुंजाभाऊ डोळसे, सोनाजी काळे,नारायण काळे, संजय कुऱ्हाडे, निवृत्ती लाड, सीमा कंची, सुनीता वाडकर, भारती भदर्गे, सुनील कीर्तने, दीपक भदर्गे, कांचन झोडपे बाबाराव जोंधळे आदी कर्मचारी उपस्थित होते.