व्हॉट्सअप ग्रुप अँडमिनसह सदस्यांना कारवाईचा इशारा
परभणी/चारठाणा (Parbhani Assembly elections) : सध्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. या काळात सोशल मीडियावरील वेगवेगळ्या ग्रुपवर पोस्ट, फोटो किंवा व्हिडीओ छेडछाड करून ते व्हायरल केले जात आहे. यामुळे वाद होण्याची शक्यता असते. हाच धागा पकडून चारठाणा येथील पोलीस ठाण्यातील ग्रामीण पोलिसांनी एक आदेश निर्गमित करून कारवाईचा इशारा दिला आहे. (Parbhani Assembly elections) एखाद्या सदस्याने जरी वादग्रस्त मेसेज केला, तर ग्रुप अँडमिनवरही कारवाई होणार आहे. त्यामुळे अँडमिनने आजच सेटिंग बदलण्याची गरज आहे. प्रत्येक सोशल मीडियासह प्रत्येक हालचालीवर करडी नजर राहणार आहे. कोणत्याही ग्रुपवर किंवा इतर माध्यमातून वादग्रस्त पोस्ट किंवा वक्तव्य करू नये. अन्यथा अँडमिनवरही कारवाई केली जाईल, असा इशारा ग्रामीणचे ठाणेदार सुनिल अंधारे यांनी दिला.
सध्या समोरासमोर भेटण्याऐवजी लोक मोबाइल, सोशल
मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत आहेत. यासाठी फेसबुक, व्हॉट्सअँपचा इस्टग्रामचा वापर जास्त प्रमाणात केला जात आहे. यात ओळखीचे, अनोळखी अशा लोकांचा ग्रुपही असतो. यातील सर्वच वादग्रस्त असतात, असे नव्हे. परंतु, काही लोक एखादी पोस्ट टाकून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यावर चर्चा होते आणि त्यातून मोठा वाद होण्याची शक्यता असते. असे वाद टाळण्यासाठीच आता अँडमिनने आपल्या मोबाइलमधील सेटिंग बदलून कुड ओन्ली अँडमिन अशी करावी. अन्यथा एखाद्या सदस्याबरोबर अॅडमिनवरही पोलिस कारवाई होऊ शकते.
लोकसभा निवडणुकीत (Parbhani Assembly elections) सोशल मीडियावर जातीयवाद व आपसी वाद निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी विशेष मोहीम राबवत अनेकांवर कारवाई केली होती. अनेक ठिकाणी गुन्हे ही दाखल केले होते. यावेळेस विधानसभा व निवडणुकीतही असेच काहीसे वातावरण आहे. उमेदवार निश्चित होण्याआधीच सोशल मीडियावर चर्चा, वादावादी, आक्षेपार्ह पोस्ट असे प्रकार घडताना पाहायला मिळाले आहेत. यातून मोठा वाद होऊन गैरप्रकार घडू नये, यासाठी येथील ग्रामीण पोलिसांनी सोशल मीडियावर आपली करडी नजर असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
पोस्ट टाकताना प्रत्येकाने घ्यावी काळजी एकही वादग्रस्त पोस्ट दिसली तर संबंधितासह ग्रुप अॅडमिनलाही जबाबदार धरून कारवाई केली जाणार आहे. सोशल मीडियासंदर्भातील आचारसंहिताच पोलिसांनी जारी केली आहे. दरम्यान, असा एकही गुन्हा दाखल होणार नाही, याची काळजी लोकांनी घेतली पाहिजे.
– सुनिल अंधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक चारठाणा