परभणी (Parbhani) :- केंद्र शासनाने(Central Govt) खरिप हंगामातील पिके संरक्षित करण्यासाठी ३१ जुलैची अंतिम तारिख दिली होती. मुदतीअखेर जिल्ह्यात ३ लाख ५७ हजार शेतकर्यांनी पिकविमा कंपनीकडे पिके संरक्षीत केली आहेत.
शेतकर्यांनी सोयाबीन व कापूस या दोन नगदी पिकांची सर्वाधिक पेरणी
जिल्हा कृषी अधीक्षक(Superintendent of Agriculture) कार्यालयाच्या वतीने ५ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पेरणी प्रस्तावित केली आहे. त्यानुसार शेतकर्यांनी सोयाबीन व कापूस या दोन नगदी पिकांची सर्वाधिक पेरणी केली. जिल्ह्यात अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन तर दोन लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. दरवर्षी कधी अतिवृष्टी (Heavy Rain)तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे शेतकर्यांच्या नशीबी संघर्षच येतो. पिकांचे मोठे नुकसान होऊन आर्थिक नुकसान (financial loss) सहन करावे लागते. संभाव्य धोका टाळण्यासाठी शासनाकडून शेतकर्यांना एक रुपयात विमा देण्याची योजना सुरु केली आहे. या योजनेस शेतकर्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी जिल्ह्यातील साडे तीन लाख शेतकर्यांनी पिके संरक्षित केली आहेत.