परभणी/पाथरी (Parbhani):- विधान परिषदेचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांना महाराष्ट्र राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने देण्यात येणारा उत्कृष्ट भाषण पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या हस्ते 3 सप्टेंबर रोजी विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात प्रदान करण्यात आला .
विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात पार पडला पुरस्कार सोहळा
राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या वतीने विधिमंडळाच्या सदस्यांना सन 2018 पासून 20 24 पर्यंत च्या कालावधीसाठी देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट संसदपटू व उत्कृष्ठ भाषण या पुरस्कारांची घोषणा होत सन 2022 ते 20 23 करिता महाराष्ट्र विधान परिषद उत्कृष्ट भाषण पुरस्कारासाठी पिठासीन अधिकारी यांनी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची निवड करण्यात आली होती .
मंगळवार 3 सप्टेंबर रोजी विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये दुपारी ३.३० वाजता आयोजित एका सोहळ्यामध्ये देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांना हा पुरस्कार देण्यात आला .
यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन(Radhakrishnan), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आदींची उपस्थिती होती .