परभणी(Parbhani) :- सेलू तालुक्यातील हातनूर येथे एका मुलीचा मोबाईल नंबर मागण्यावरून झालेल्या मारहाण (beating) प्रकरणी ४ जणावर १५एप्रिल रोजी दुपारी १ वाजता गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
एका मुलीचा मोबाईल नंबर मागण्यावरून घडली घटना…!
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे तालुक्यातील हातनूर येथे मुकेश खोबराजी पंडित वय ३१ वर्षीय हे १५ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता घरासमोर सार्वजनिक रस्त्यावर उभे असताना चिंतामणी बन्सी खंदारे यांने मुलीचा नंबर मागण्याच्या कारणावरून शिवीगाळ (Abusing) करून चापडबुक्क्याने मारहाण केली तर महिंद्रा आश्रोबा खंदारे याने हातातील धारदार वस्तूने मुकेश पंडित यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर व छातीवर मारून जखमी केले. यावेळी चेतन चिंतामणी खंदारे याने हातातील काठी मुकेश पंडित यांच्या कपाळावर मारून जखमी केले. घराच्या समोर सुरू असलेल्या या भांडणाचा आवाज ऐकून मुकेश पंडित याची पत्नी आनन्या पंडित, बाळंतपणासाठी आलेली बहिण उषा सहेजराव आल्या असता त्यांना कैलास आश्रुबा खंदारे यांनी काठीने मारहाण करून जखमी केले आणि शिवीगाळ करत उभयतांना जीवे मारण्याची धमकी दिली.
मुकेश पंडित यांने दिलेल्या फिर्यादीवरून विविध कलमानुसार चिंतामणी खंदारे ,महेंद्र खंदारे, कैलास खंदारे, चेतन खंदारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वालुर दूरक्षेत्र पोलीस चौकीचे पोलीस हवलदार अशोक हिंगे पुढील तपास करत आहेत.