Parbhani :- परभणीतील पाथरी तालुक्यातील सारोळा बु. परिसरात अंगावर विज कोसळून एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. ही घटना सोमवार १९ मे २०२५ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास सारोळा बु. पाटी जवळ घडली. धोंडीराम बापूराव हलबुरगे (वय ४२, रा. केकरजवळा, ता. मानवत, जि. परभणी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते एमएच २२ बीएफ ३२४९ या क्रमांकाच्या दुचाकीवरून केकरजवळा गावाकडे जात असताना जोरदार वादळ व विजेचा कडकडाट सुरू होता. त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची खबर मयताचे चुलते यांनी पाथरी पोलीस ठाण्यात दिली असून, पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे .पुढील तपास पोलीस हवालदार अशोक धस हे करत आहेत.