परभणी (Parbhani):- परभणी तालुक्यातील पेडगाव येथे आज सकाळी झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain)नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आगरी विमा लवकर देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी परभणी तालुक्यातील परभणी पुणे महामार्गावरील पेडगाव येथे काँग्रेस (Congress)पक्षाकडून अर्धा तास रास्ता रोको करण्यात आला.
बाळासाहेब रेंगे पाटील व असंख्य काँग्रेस व महाविकास आघाडी पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर हजर
यावेळी आमदार सुरेश वरपूडकर, बाळासाहेब रेंगे पाटील व असंख्य काँग्रेस व महाविकास आघाडी पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर हजर होते. अर्धा तास रास्ता रोको झाल्यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले व आंदोलन स्थळी ग्रामीण पोलिसांनी मोठा फौज फाटा तैनात केला होता. आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत मार्ग काढण्यात येईल असं अधिकारी व परभणीचे तहसीलदार यांनी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.