परभणी/जिंतूर(Parbhani):- येथील कृषी उत्पन्न बाजार (Agricultural produce market) समिती प्रशासक कार्यकाळात अपहार प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने एकास पुणे- सातारा परिसरातून अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली इतर आरोपींचा देखील शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
परभणीच्या जिंतूर पोलीसांकडून शोध सुरु
जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधर बोर्डीकर यांच्या फिर्यादीवरून मागील तीन-चार वर्षात मोठ्या प्रमाणावर अपहार झाल्याची तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशीत अपार झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सभापती बोर्डीकर यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात प्रशासक मंडळावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास चालू असताना आरोपींनी अटकपूर्व जामीन घेण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु त्यांना जामीन मिळाला नाही. हा गुन्हा ३३ लाख रुपयांचा आहे. परंतु या गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेऊन न्यायालयाने(Court) अटकपूर्व जामीन फेटाळून लावले. याच प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या व आर्थिक गुन्हे शाखेच्या (Economic Offenses Branch) संयुक्त विद्यमाने रुपेश चिद्रवार यांना पुणे – सातारा परिसरातून अटक केली आहे. ही अटक ६ जुलै च्या रात्री झाली असून ७ जुलैला परभणीकडे आणले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास चालू असून इतर आरोपींचा देखील शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या आरोपीस उप पोलीस निरीक्षक अजित बिरादार व त्यांच्या टीमने पकडले असल्याचे समजते.