महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी शिक्षक सेल तर्फे आंदोलन.!
परभणी (Parbhani Bombing protest) : अर्थसंकल्पात शिक्षण विभागासाठी तरतुद केलेल्या ज्यादा निधीतून १४ ऑक्टोबर २०२४ रोजी टप्पा वाढीसाठी काढलेल्या शासन आदेशातील तरतुदीसाठी निधी परावर्तीत करण्याची मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या वतीने गुरुवार १३ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबमारो आंदोलन (Parbhani Bombing protest) करण्यात आले. यानंतर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, अर्थमंत्री अजित पवार यांना निवेदन सादर करण्यात आले.
आंदोलनकर्त्यांनी अंशत: अनुदानित शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना १५ नोव्हेंबर २०२१ व ४ जून २०१४ मधील तरतुदीनुसार प्रतिवर्षी विनाअट टप्पा वाढ लागु करावी, शासन निर्णयात नमुद केल्या प्रमाणे तीसच्या आत शासनस्तरावर (Parbhani Bombing protest) त्रुटी पुर्तता केलेल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांना समान टप्पा द्यावा, राज्यातील पुणे स्तरावरील अघोषीत शाळांना अनुदानास पात्र करुन वेतन अनुदान मंजुर करावे, नोव्हेंबर २००५ पुर्वी जाहिरात आलेल्या किंवा नियुक्त टप्पा अनुदान असलेल्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागु करावी, संगणक शिक्षक यांना सेवेत कायम करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिलेल्या (Parbhani Bombing protest) निवेदनावर प्रा. किरण सोनटक्के, केशन आण्णा दुधाटे, बाळासाहेब राखे, गोपाळराव भुसारे, यशवंत मकरंद, प्रा. दिपक कुलकर्णी, प्रा. संघपाल सोनोने, प्रा. रविकांत जोजारे, तुषार गोळेगावकर, मोतीराम शिंदे, प्रा. गोविंद चोरघडे, प्रा. विशाल जाधव, प्रा. शिवराम शिंदे, गोपाळ गोरे, माधव लोखंडे, राम भुरे, सद्दाम बागवान, रवि लोहट, सिकंदर पाचमासे, गजानन सोळंके, सुरेंद्र काळे, संजय देवकर, वसंतराव देशमुख, गुलाब हरकळ, प्रकाश आडगावकर, रविकांत जोजारे, मेहराजोद्दिन सिद्दिकी आदींची नावे आहेत.