परभणी/गंगाखेड(Parbhani/Gangakhed):- शहरातील डॉक्टर लाईन परिसरात घराबाहेर लावलेली बुलेट दिनांक २८ एप्रिल रविवार रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास तीन अनोळखी चोरट्यांनी चोरून नेली आहे. याप्रकरणी दिनांक २९ एप्रिल सोमवार रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात(Gangakhed Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की शहरातील डॉक्टर (Doctor) लाईन परिसरात राहणारे डॉ. भरत लक्ष्मणराव भोसले यांनी दिनांक २७ एप्रिल शनिवार रोजी रात्री त्यांची बुलेट मोटार सायकल (Bullet Motorcycle) घरासमोर हॅण्डल लॉक करून लावली असता दिनांक २८ एप्रिल रविवार रोजी मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास तीन अनोळखी चोरट्यांनी घरासमोर लावलेली बुलेट ढकलत चोरून नेल्याची माहिती शेजारी राहणाऱ्या महिलेने डॉ. भरत भोसले यांना दिली.
अनोळखी व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल
तेंव्हा सर्वत्र शोध घेवून ही बुलेट मोटार सायकल मिळून आली नसल्याने दिनांक २९ एप्रिल सोमवार रोजी त्यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तीन अनोळखी व्यक्तीविरुद्ध (Unknown Person) चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी डॉक्टर लाईन परिसरातून बुलेट मोटार सायकल चोरून नेल्याने अन्य दुचाकी मालकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.