परभणी – जिंतूर रोडवर नांदापूर पाटीजवळ अपघात
परभणी/नांदापूर (Parbhani Bus Accident ) : परभणी – जिंतूर रस्त्यावर नांदापूर पाटीपासून जवळस एसटी बस आणि दुचाकीचा अपघात झाला. या घटनेत दुचाकी वरील दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. मयत तरुण हे जिंतूर तालुक्यातील केहाळ येथील असल्याची माहिती मिळाली आहे. (Parbhani Bus Accident) सदरचा अपघात रविवार २० एप्रिल रोजी दुपारी ३:३० च्या सुमारास घडला.
मयत तरुण जिंतूर तालुक्यातील केहाळ येथील…!
या (Parbhani Bus Accident) अपघाता विषयी अधिक माहिती अशी की, एम.एच.४० एन.९५०४ या क्रमांकाची बस रीसोड येथुन प्रवाशी घेवून लातूर ला जात हो ती. तर एम.एच.२२ के.०५५७ या क्रमांकाच्या दुचाकीवरुन दोन तरुण परभणी कडून जिंतूर कडे जात होते. नांदापूर पाटीपासून एक किलोमिटर अंतरावर बस आणि दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. (Parbhani Bus Accident) अपघातात तरुणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोनि. श्रीकांत डोंगरे, सपोनि विक्रम हराळे, सपोउपनि. के. एस. कादरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. मयत तरुण हे जिंतूर तालुक्यातील केहाळ येथील असून त्यांची आडनावे जिवने आणि घुगे असे असल्याची समजले आहे.
दुचाकीच्या धडकेत युवकाचा मृत्यू
जिंतूर : भरधाव वेगातील दुचाकी चालकाने दिलेल्या धडकेत एका तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना १९ एप्रिल रोजी साायंकाळी ५ च्या सुमारास जिंतूर तालुक्यातील बेलखेडा पाटीजवळ घडली. या (Parbhani Bus Accident) प्रकरणी दुचाकी चालकावर जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारायण पालवे यांनी तक्रार दिली आहे. संदिप ज्ञानदेव पालवे (वय २५ वर्ष) असे मयताचे नाव आहे. मोटारसायकल क्रमांक एम.एच. २२ – बी.बी. २७९५ च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात निष्काळजीपणे चालवुन संदिप पालवे यांना धडक दिली. (Parbhani Bus Accident) अपघातात गंभीर जखमी झालेल्या संदिप पालवे यांचा मृत्यू झाला. तपास सपोनि. पुंड करत आहेत.