परभणी (Parbhani):- मी तुझ्या सोबत लग्न केले आहे, असे खोटे बोलून एका अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध (Physical relationship) ठेवत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरुन अल्पवयीन आरोपीवर नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणातील घटनास्थळ ग्रामीण पोलीस ठाणे हद्दितील असल्याने हा गुन्हा ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
पिडितेच्या तक्रारीवरुन अल्पवयीन आरोपीवर गुन्हा दाखल
अत्याचारातील पिडित मुलगी ही परभणी तालुक्यातील एका गावामधील आहे. तर आरोपी हा तालुक्यातील कुंभारी येथील रहिवाशी आहे. शाळेत शिकत असताना मुलीची आरोपी सोबत ओळख झाली होती. मे २०२४ मध्ये आरोपीने मी तुझ्या सोबत लग्न केले आहे, असे खोटे बोलून पिडितेवर अत्याचार केला. हा प्रकार जून २०२४ पर्यंत वारंवार घडला. यानंतर १६ वर्षीय पिडितेने नवा मोंढा पोलीस ठाणे(Police station) गाठत आरोपी विरोधात तक्रार दिली आहे. सदर प्रकरणी अत्याचार, पोक्सो, अॅट्रॉसिटी अॅक्ट(Atrocities Act) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे करत आहेत.