परभणी/सोनपेठ (Parbhani) :- पाणी प्लाँटचा व्यवसाय बंद पडावा या उद्देशाने एका व्यवसायीकाला मानसीक त्रास देण्यात आला. थकीत वीज बिलाच्या नावाखाली आयफोन व दुचाकी ठेवुन घेण्यात आली. या तणावात व्यवसायीकाने ३० मार्च पूर्वी गळफास घेवून आत्महत्या केली होती. सदर व्यवसायीकाला आत्महत्येस (suicide) प्रवृत्त केल्या प्रकरणी एकावर ३ एप्रिल रोजी सोनपेठ पोलिसात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
थकीत वीज बिलासाठी आयफोन, दुचाकी ठेवुन घेतली
बबन माणिकराव देशमुख यांनी तक्रार दिली आहे. त्यांचा मुलगा रणजीत देशमुख याने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी बालासाहेब विठ्ठलराव शिंदे याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी बालासाहेब शिंदे यांचे शिरसाळा रोडवर कॉम्पलेक्स आहे. येथील शटर मध्ये रणजित देशमुख हे पाणी प्लाँटचा व्यवसाय करत होते. भाडे करार संपण्यापूर्वी प्लाँट बंद पाडण्याच्या उद्देशाने आरोपी रणजित देशमुख यांनी लाईट बील भरलेले असताना देखील मानसीक त्रास देण्यास सुरुवात केली. महावितरणकडे तक्रार करुन वीजेचे कनेक्शन तोडले. त्यामुळे व्यवसाय बंद पडला. त्यानंतर संबंधीताने तात्काळ शटर खाली करण्याचे सांगत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच थकीत बिलाच्या नावाखाली रणजित यांच्या जवळील आयफोन व दुचाकी ठेवून घेतली. या मानसीक त्रासाला कंटाळून रणजित यांनी गळफास घेवून आत्महत्या केली होती. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास सपोनि. चव्हाण करत आहेत.