परभणी (Parbhani):- शहरातील जिंतूर रोडवर असलेल्या मातोश्री मोटर्सच्या ओकिनावा या ईलेक्ट्रीक बाईकच्या शोरुमला शनिवार २८ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास आग लागली. आगीमध्ये (fire) शोरुममधील गाड्या, टायर, स्पेअर पार्ट व इतर साहित्य मिळून जवळपास ३० लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
जिंतूर रोडवर ओकिनावा ईलेक्ट्रीक बाईकचे शोरुम आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे (short circuit) शोरुमला आग लागली. आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाचे वसीम अखिल अहेमद, मदन जाधव, सय्यद नजीब, निखिल बेंडसुरे यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविली. या आगीबाबत शोरुमचे भगवान डहाळे यांनी दिलेल्या माहिती नुसार शोरुम मधील ईलेक्ट्रीक बाईक, टायर, स्पेअर पार्ट, टिव्ही, संगणक व इतर साहित्य मिळून जवळपास २५ ते ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.