नानलपेठ पोलिसांची मोठीं कारवाई, नऊ जुगार्यांवर गुन्हा दाखल
परभणी (Parbhani Crime) : येथील नानलपेठ पोलिसांच्या पथकाने २७ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मराठवाडा प्लॉट भागात तिर्रट जुगार्यांवर छापा टाकला. या कारवाईत रोख रक्कम मोबाईल, दुचाकी मिळून १ लाख ७७ हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त (Parbhani Crime) करण्यात आला आहे. सपोनि. सय्यद मुक्तार जाफर यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांचे पथक गस्त घालत असताना या पथकाला काही इसम तिर्रट नावाचा जुगार खेळत बसले आहेत, अशी माहिती मिळाली.
सदर माहितीवरुन पोलिसांनी छापा टाकून १४ हजार ५७० रुपये रोख, ८८ हजार रुपये किंमतीचे मोबाईल आणि दुचाकी मिळून १ लाख ७७ हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आसिफोद्दिन खतीब, अशोक बोबडे, दिग्वीजय रणवीर, सुरेश चांदणे, गणेश बिलवरे, बापुराव जाधव, सय्यद हबीब, भागवत भोरपे, शेख फेरोज यांच्यावर (Parbhani Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोह. पवार करत आहेत.
अवैध धंदे चालकावर कारवाई
परभणी : नवा मोंढा पोलिसांच्या पथकाने खानापुर फाट्याजवळ कारवाई करत एका जवळून रोख रक्कम व अवैध धंद्यांचे साहित्य जप्त केले. सदर प्रकरणी काशिनाथ डोंबे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. जिंतूर पोलीस ठाण्यात अवैध धंद्याप्रकरणी राजेश पुंड, विकास पवार या दोघांवर गुन्ह्याची नोंद (Parbhani Crime) करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.