नानलपेठ हद्दीतील प्रकरण
परभणी (Parbhani Crime) : आक्या कुठे आहे, असे म्हणत एका १८ वर्षीय तरुणीला जबर मारहाण करणार्या (Parbhani Crime) आरोपीस न्यायालयाने एक वर्ष कारावास, दिड हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. बुधवार १९ जून रोजी मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय परभणी न्या. डि.एन. खैर यांनी निकाल दिला आहे. या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, परभणी शहरातील पाथरी रोडवरील भारत नगरात आरोपी स्वप्नील प्रकाश टाकणखार याने तक्रारदार युवतीस आक्या कुठे आहे, अशी विचारणा केली. यावर तरुणीने मला माहित नाही, असे उत्तर दिल्यानंतर आरोपीने तरुणीला जबर मारहाण केली.
मुख्य न्यायदंडाधिकारी परभणी यांचा निकाल
सदर प्रकरणामध्ये (Parbhani police) नानलपेठ पोलीस ठाण्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल (Parbhani Crime) करण्यात आला. सपोउपनि. के. आर. सरोदे यांनी तपास करत दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्पेâ सहा साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने आरोपी स्वप्नील टाकणखार याला एक वर्ष शिक्षा, दिड हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकिल अॅड. डि.बी. गिते यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी पोशि. बी.बी. जवादे यांनी काम केले.