परभणी शहरातील खानापूर येथील घटना
परभणी (Parbhani Crime) : दोन भावांच्या संपत्तीच्या वादामुळे समजावण्यासाठी आलेल्या एका भावाच्या सासु, मेव्हणा, मेव्हण्याची बायको आणि एका १९ वर्षीय युवकावर कुर्हाडी, कोयत्याने जीवघेणा हल्ला (Parbhani Crime) करण्यात आला. ही घटना सोमवार २९ जुलै रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास परभणी शहरातील खानापूर परिसरात घडली. जखमींना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात (Parbhani Hospital) दाखल करण्यात आले आहे.
जखमी रूग्णालयात दाखल
याबाबत पोलीस (Parbhani Police) सुत्रांकडून मिळालेली माहितीनुसार, खानापूर येथील संजय काळे, कैलास काळे या दोन भावांमध्ये संपत्तीमधून वाद सुरू आहे. हा वाद मिटविण्यासाठी बैठक बोलविण्यात आली होती. वाद न करता आपसात प्रकरण मिटविण्याकरीता काही नातेवाईकही आले होते. संजय काळे यांच्या सासरकडील मंडळीही आली होती. सोमवारी सकाळी संपत्तीच्या वादात संजय काळे यांच्या सासरकडील मंडळींना कुर्हाडी, कोयत्याने जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये स्वाती तुकाराम नावळे वय ३१ वर्ष, तुकाराम धारोजी नावळे वय ३६ वर्ष, रुक्मीनीबाई धारोजी नावळे वय ६० वर्ष सर्व रा. असोला, श्रीहरी संजय काळे वय १९ वर्ष, रा.खानापूर हे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल (Parbhani Hospital) करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोहेकॉ आर.एस.मुंढे, भागवत नागरगोजे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर प्रकरणी गुन्ह्याची (Parbhani Crime) नोंद झाली नव्हती.