परभणी (Parbhani Crime) : सेलू पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या मानवत तालुक्यातील मानोली येथे रस्त्यावर उभी असलेली दुचाकी बाजूला घेण्याच्या वादातून झालेल्या भांडणात ३ जणावर १०एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजता (Parbhani Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती. याप्रमाणे मानवत तालुक्यातील मानोली या सेलू पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या गावात रस्त्यावर उभी करण्यात आलेली दुचाकी बाजूला घेण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात सावता सतीश तळेकर वय २३ वर्षे यास १० एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता आनंदा तळेकर यांच्या घरासमोर रस्त्यावर श्रीपती पंडितराव तळेकर यांनी रस्त्यावर उभी केलेली दुचाकी बाजूला घेण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात श्रीपती तळेकर याने शिवीगाळ केली तर विकास श्रीपती तळेकर यांनी डोक्यात दगड मारून दुखापत केली.
विशाल श्रीपती तळेकर याने लाथाबुक्यानी मारहाण केल्या प्रकरणी सावता सतीश तळेकर याने दिलेल्या फिर्यादीवरून विविध कलमानुसार श्रीपती पंडितराव तळेकर ,विकास श्रीपती तळेकर ,विशाल श्रीपती तळेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Parbhani Crime) पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर पुढील तपास करत आहेत.