परभणी स्थागुशाची मोठी कारवाई
परभणी (Parbhani Crime) : पशुधन चोरी करणार्या आंतरराज्यीय टोळीचा (Crime Branch Police) स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. सहा जिल्ह्यातील २५ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. या कारवाईत १ लाख ६८ हजार ५०० रुपये रोख, गुन्ह्यात वापरलेले वाहन, हत्यार जप्त करण्यात आले आहे. मागील काही दिवसात (Parbhani city) परभणी जिल्ह्यासह राज्यातील विविध जिल्ह्यात पशुधन चोरीचे प्रमाण वाढले होते. पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी स्थागुशाचे पोनि. अशोक घोरबांड यांना सदर गुन्ह्यातील (Parbhani Crime) आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघड करण्याविषयी सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार (Parbhani Crime) पोलीसांनी गोपनिय माहिती आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. गजानन वाघमारे, जाकेर कुरेशी, सुरेश खिल्लारे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी हरयाणा राज्यातील व स्थानिक दहा साथीदारांच्या मदतीने गुन्हे केल्याची कबुली दिली. परभणी जिल्ह्यातील १३, जालना १, वाशिम २, नांदेड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यातील प्रत्येकी ३ अशा एकूण २५ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.
सहा जिल्ह्यातील २५ गुन्ह्यांची उकल
ही कारवाई (Parbhani Crime) पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांच्या नेतृवात पोनि. अशोक घोरबांड, सपोनि. भारती, राजू मुत्तेपोड, पोउपनि. गोपिनाथ वाघमारे, अजित बिरादार, चंदनसिंह परिहार, पोलीस अंमलदार बाळासाहेब तुपसुंदरे, रवि जाधव, दिलावर पठाण, शेख रफीक, निलेश परसोडे, विलास सातपुते, राहुल परसोडे, रंगनाथ दुधाटे, सचिन भदर्गे, विष्णू चव्हाण, सिध्देश्वर चाटे, हनुमान ढगे, संजय घुगे, नामदेव डुबे, मधुकर ढवळे, राम पौळ, दिलीप निलपत्रेवार, परसराम गायकवाड, हुसेन पठाण, वैâलास केंद्रे, मो. इमरान, गणेश कौटकर, राजेश आगाशे यांच्या पथकाने केली.