परभणी शहरातील रामकृष्ण नगरामधील घटना; नवा मोंढा पोलीसात गुन्हा
परभणी (Parbhani Crime Case) : देवदर्शनाहून परत येत असलेल्या ६५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण मोटार सायकलवर आलेल्या अनोळखी इसमाने बळजबरीने हिसकावीले. ही घटना परभणी शहरातील रामकृष्ण नगर भागात सोमवार ४ नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रजनी सुधाकरराव चिद्रवार यांनी तक्रार दिली आहे. (Parbhani Crime Case) फिर्यादी या देवदर्शन करून पाई घराकडे येत असतांना मोटारसायकलवर आलेल्या अज्ञाताने त्यांच्या गळ्यातील १ लाख ८० हजाराचे गंठण बळजबरीने हिसकावून पळ काढला. नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणीतील गालीब नगरात घरफोडी
परभणी: शहरातील गालीब नगरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत ३५ हजार रूपयाचा मुद्देमाल लंपास केला. या (Parbhani Crime Case) प्रकरणी मदिनोद्दीन पठाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून ४ नोव्हेंबरला अज्ञात चोरट्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोह. गौस करत आहेत.