परभणीतील पाथरी शहरातील सेलू कॉर्नरवर असलेल्या बँकेतील घटना
परभणी (Parbhani Crime) : बँक खात्यातून रोकड काढल्यानंतर त्याची नोंद पासबुकवर घेत असताना शेतकर्या जवळील पन्नास हजारांची रोकड चोरट्याने लंपास केली. ही घटना १२ फेब्रुवारी रोजी दुपारी अडिच ते तीनच्या सुमारास घडली. या प्रकरणी १९ फेब्रुवारीला (Parbhani Crime) पाथरी पोलिसात अनोळखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारायण जानकीराम गरड यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे १२ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास पाथरी येथील सेलू कॉर्नर भागात असलेल्या एसबीआय बँक शाखेत आले होते. त्यांनी त्यांच्या खात्यावरुन पन्नास हजारांची रोकड काढली. ही रोकड स्वत: जवळील कापडी पिशवीत ठेवली. बँकेच्या पासबुकवर पैसे काढल्याची नोंद घेण्यासाठी गेट जवळील मशीनवर आले. याच (Parbhani Crime) दरम्यान अनोळखी चोरट्याने त्यांच्या जवळील पन्नास हजार रुपये काढून घेतले. घडला प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी पाथरी पोलीस ठाणे गाठत अनोळखी चोरट्या विरोधात तक्रार दाखल केली.
वाघाळा शिवारातून दुचाकी लंपास
परभणी : पाथरी तालुक्यातील वाघाळा शिवारातून एकाची दुचाकी अनोळखी चोरट्याने लंपास केली. या (Parbhani Crime) प्रकरणी १९ फेब्रुवारीला पाथरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भानुदास राठोड यांच्या ताब्यातील एम.एच. २२ बी.ई. ३३३१ या क्रमांकाची गाडी चोरीला गेली आहे. शोध घेऊनही वाहन मिळून न आल्याने गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.