परभणीतील काद्राबाद प्लॉट येथील घटना दुचाकीची तोडफोड करत केले नुकसान…!
परभणी (Parbhani Crime) : कटरने हातावर वार करत एका जवळील रोकड लुटण्यात आली. त्याच प्रमाणे दुचाकीवर लाकडाने मारुन तोडफोड करत नुकसान करण्यात आले. ही घटना ११ सप्टेंबर रोजी नानलपेठ पोलीस ठाणे हद्दितील काद्राबाद प्लॉट परिसरात घडली. या (Parbhani Crime) प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मो. अलिमोद्दिन यांनी तक्रार दिली आहे. शेख सुलेमान उर्फ बादल याने फिर्यादी घरी असताना त्यांना शिवीगाळ करुन हातातील कटरने वार केले.
फिर्यादीच्या खिशातून बळजबरीने आठशे रुपये काढून घेतले. फिर्यादीच्या बहिणीलाही चापटाने मारहाण केली. या ठिकाणी उभ्या असलेल्या फिर्यादीच्या दुचाकीवर काठीने मारुन दुचाकीची तोडफोड करत नुकसान केले. या (Parbhani Crime) प्रकरणी नानलपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि. कारवार करत आहेत.
केस केल्याचा राग;घरातील वस्तू जाळल्या
परभणी : केस केल्याचा राग मनात धरुन घरासमोर ठेवलेल्या वस्तू जाळून ३ हजार २२० रुपयाचे नुकसान करण्यात आले. ही घटना ११ सप्टेंबर रोजी पहाटे सव्वा तीनच्या सुमारास काद्राबाद प्लॉट भागात घडली. मोहम्मद अलिमोद्दिन यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शेख सुलेमान उर्फ बादल याच्यावर नानलपेठ पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोह. सोडगीर करत आहेत.




