परभणीतील पालम तालुक्यातील पेंडू खू. येथील घटना, अकास्मात मृत्यूची नोंद
परभणी (Parbhani Crime) : मुलीच्या लग्नाकरीता घेतलेले तीन लाख रूपये कर्ज कसे फेडावे या विवंचनेत वडिलाने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता पालम तालुक्यातील पेंडू खू. येथे उघडकीस आली. सदर प्रकरणी पालम पोलीसात (Parbhani Crime) अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बाबाराव गाडे यांनी तक्रार दिली आहे. मारोती बाबाराव गाडे वय – ५० वर्ष असे मयताचे नाव आहे. मारोती गाडे यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नाकरीता तीन लाख रूपये कर्ज घेतले होते. हे कर्ज कसे फेडावे या चिंतेच विलास विठ्ठलराव वंजे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन मारोती गाडे यांनी आत्महत्या केली. (Parbhani Crime) पालम पोलीसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. तपास पोह कोलमवाड करत आहेत.
विद्यार्थ्याने घेतला दोरीने गळफास
परभणी तालुक्यातील हासनापूर येथे तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्याने किरायाने राहत असलेल्या खोलीत छताच्या लोखंडी कडीला दोरीने गळफास घेऊन (Parbhani Crime) आत्महत्या केली. ही घटना ४ मार्च रोजी दुपारी ४ च्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी माधव देवकांबळे यांनी दिलेल्या खबरीवरून परभणी ग्रामीण पोलीसात अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सपोउपनि.कनाके करत आहेत.