परभणी (Parbhani):- देव दर्शनासाठी गेलेल्यांचे घर फोडत चोरट्यांनी सोन्या- चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना २६ नोव्हेंबर रोजी शहरातील रेणुका नगर भागात उघडकीस आली. या प्रकरणी २७ नोव्हेंबरला अज्ञातावर नानलपेठ पोलीस ठाण्यात (Police station)गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरातील सोन्याचे व हिर्याचे दागिने, रोख रक्कम मिळून ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास
राजवर्धन यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे रेणुका नगर या ठिकाणी किरायाच्या घरात राहतात. फिर्यादी कुटूंबासह घर बंद करुन शेगाव (Shegaon)येथे देवदर्शनासाठी गेले होते. या दरम्यान अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या घराच्या दाराचे कुलूप कडीकोंडा तोडून घरामध्ये प्रवेश केला. घरातील सोन्याचे व हिर्याचे दागिने, रोख रक्कम मिळून ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. २६ नोव्हेंबरला सकाळी घटना उघडकीस आली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव पंचनामा केला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर नानलपेठ पोलिसात गुन्हा (Crime)नोंदविण्यात आला आहे. तपास पोह. पवार करत आहेत.