परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटना
परभणी (Parbhani Crime) : तु आमच्या पेशंटची काळजी करत नाहीस त्याच्या पोटात दुखत आहे. असे म्हणत दोघांनी थापड बुक्क्यांनी मारहाण करुन व अश्लील शिवीगाळ करत गालावर व इतर ठिकाणी मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी दोघांविरुध्द (Parbhani Police) नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विषयी अधिक माहिती अशी की, शुभम उत्तम अंभोरे वय २४ वर्ष व्यवसाय वार्डबॉय खासगी नोकरी, रा. रमाबाई आंबेडकर नगर परभणी हे मागील चार वर्षांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात (Parbhani Hospital) एमएमडब्लु वॉडात वॉर्ड बॉय म्हणुन काम करतो.
नानालपेठ पोलीसात गुन्हा दाखल
त्याची बुधवार ५ जुन रोजी रात्री ८ ते सकाळी ८ या दरम्यान डियुटी लागली असता पेशंट अरुन अश्रोबा अंधारे नेहरु नगर परभणी हे अॅडमीट होते. रात्री ११.२८ च्या सुमारास सिस्टर व सिक्युरीटी गार्ड सोबत स्टाफ रुम मध्ये असतांना पेशंटच्या नातेवाईक व त्याच्या सोबतचा मित्र दौलत बावरी यांनी “तु आमच्या पेशंटची काळजी करत नाहीस”. त्याच्या पोटात दुखत आहे. असे म्हणत थापड बुक्क्यांनी मारहाण केली व अश्लील शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. (Parbhani Hospital) याप्रकरणी पेशंटचे नातेवाईक व त्याचा मित्र दौलत बाबरी या दोघांवर नानलपेठ पोलीस ठाण्यात गुरुवार ६ जुन रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास, (Parbhani Police) नानलपेठ पोलीस ठाण्याचे हे.कॉ.राजेश राठोड हे करत आहेत.