परभणी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…!
परभणी (Parbhani Crime) : जिल्ह्यातील शेतकर्यांच्या शेतातील पाण्याच्या विद्युत मोटारी चोरी गेल्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनांमधील आरोपींना स्थागुशाच्या पथकाने शुक्रवार १४ मार्च रोजी ताब्यात घेतले आहे.
या घटने बाबत ची अधिक माहिती अशी की, विद्युत मोटार चोरीच्या घटना (Parbhani Crime) जिल्ह्यात घडल्या होत्या. याची दखल घेत पोलीस अधिक्षक रविंद्र सिंह परदेशी, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात स्थागुशाचे पोनि. पाटील व यांनी यामध्ये वेग वेगळे पथक सदर आरोपींची माहिती काढत गस्त घालत असतांना गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी पांडु गुलाब काळे रा.मगरुळ ता.मानवत, श्रावण अण्णा काळे रा. तामसवाडी यांना ताब्यात घेतले असता, त्यांनी गुन्ह्यातील साथीदार संतोष सचिन पवार रा. मंगरुळ याच्या सोबत (Parbhani Crime) गुन्हे केल्याचे सांगीतल्यावरुन सदर तीन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
या आरोपींची विचारपुस केली असता एकुण चार गुन्हे उकल झाले आहेत. गुन्ह्यातील मुद्देमाल विद्युत मोटार, वायर व स्टार्टर असा एकुण ३५ हजारांचा मुद्देमाल आरोपी विशाल अमरसिंग ठाकुर यास भंगारच्या भावात विकल्याचे सांगीतले. यावरुन चार आरोपीं विरुध्द मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Parbhani Crime) करण्यात आला आहे. सदरची कारवाई परभणी स्थागुशाच्या पथकाने केली असून, पुढील तपास (Manvat Police) मानवत पोलिस हे करत आहे.




