परभणी (Parbhani):- ट्रॅव्हल्स बसमधून आलेल्या पार्सलमधील विविध कंपनीचे मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तू असलेले २५ लाख ३६ हजार ५२२ रुपये किंमतीचे १४ बॉक्स एकाने लंपास केले. ही घटना २५ डिसेंबर रोजी गंगाखेड रोडवरील मामु कॉफी सेंटरच्या पाठीमागे असलेल्या ट्रॅव्हल्स थांबण्याच्या ठिकाणी घडली. सदर प्रकरणी परभणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल; गंगाखेड रोडवरील घटना
बालाजी गोविंदराव कुलकर्णी यांनी तक्रार दिली आहे. आरोपी अनिकेत पवार याने चोरी करण्याच्या उद्देशाने ट्रॅव्हलस चालकाच्या स्वच्छकाला चुकीची माहिती दिली. फिर्यादी यांच्या कंपनीचे आलेल्या ३३ पार्सल बॉक्स पैकी १४ बॉक्स चोरले. या बॉक्स मध्ये २५ लाख ३६ हजार ५२२ रुपये किंमतीचे मोबाईल व ईलेक्ट्रॉनिक वस्तू (Electronic goods) होत्या. सदरचा मुद्देमाल आरोपीने अॅटोमध्ये टाकून चोरुन नेला. चोरीला गेलेल्या मुद्देमालाची फिर्यादीने कंपनीच्या व्यक्तींना माहिती दिली. त्यानंतर परभणी ग्रामीण पोलीस ठाणे गाठत अनिकेत पवार याच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे. आरोपी मुद्देमाला सहित ताब्यात घेण्यात आले आहे पुढील तपास पोउपनि. तावडे करत आहे




