परभणी/हिस्सी (Parbhani Crime) : कर्जबाजारीपणाला कंटाळून ३३ वर्षीय तरूणाने गळफास लावून (farmer suicide) आत्महत्या केल्याची घटना (Selu Police) सेलू तालुक्यातील हिस्सी येथे घडली. वैभव रामप्रसाद गात (३३) यांची हिस्सी शिवारात तीन एकर शेती आहे. यातून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा, देऊळगाव गात बँकेकडून १ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. दरम्यान नापीकी, दुष्काळ यामुळे कर्जाचा डोंगर वाढत गेला. हे कर्ज कसे फेडावे याच विवंचनेत वैभव गात हे होते. असे कुटुंबियांनी सांगतले.
दरम्यान गुरूवारी रात्री राहत्या घरातील छताच्या फनला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून (farmer suicide) आत्महत्या केली. हा प्रकार वैभव गात यांच्या आईच्या लक्षात आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी घटनेची नोंद (Selu Police) सेलू पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. वैभव गात यांच्या पश्चात आई, वडील, बहीण, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.