शहरातील पाथरी रोडवरील सोमवार रात्रीची घटना
परभणी (Parbhani Crime) : शहरातील पाथरी रोडवर असलेल्या हॉटेल चायना बार अॅण्ड रेस्टॉरंट या ठिकाणी सोमवार २६ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास तीन तरुणांनी गोंधळ घातला. हॉटेल मालकासह कर्मचार्याला *Parbhani Crime( बेदम मारहाण करण्यात आली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमागचे नेमके कारण समजू शकले नाही.
परभणी शहरातील पाथरी रोडवर हॉटेल चायना या नावाचे बार अॅण्ड रेस्टॉरंट आहे. सोमवारी रात्री तीन तरुणांनी या ठिकाणी धिंगाणा घालत हॉटेल मालक व कर्मचार्यांना मारहाण केली. या मारहाणीत बालू अण्णा यांना गंभीर दुखापत झाली. हॉटेलमधील खुर्च्या व इतर साहित्याची नासधूस करण्यात आली. असाच प्रकार रविवारी दुपारी शासकीय रुग्णालया समोर असलेल्या एम्पायर वाईन शॉपवर देखील घडला आहे.
परभणी जिल्हा मद्य विक्रेता संघटनेचे निवेदन
हॉटेल चायना येथे झालेल्या मारहाण प्रकरणात परभणी जिल्हा मद्य विक्रेता संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. या अगोदरही विविध हॉटेलवर मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. (Parbhani Crime) संबंधित प्रकरणांमध्ये आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.