परभणीत भंगार साहित्य घेवून दोघे लंपास; पोलिसात गुन्हा दाखल
परभणी (Parbhani Crime) : व्यापार्याचा विश्वास संपादन करुन ३ लाख ३४ हजार १८५ रुपये किंमतीचे भंगार साहित्य घेवून दोघेजण पसार झाले. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात (Parbhani Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद रफिक मोहम्मद बशीर यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादीचे ग्रॅण्ड कॉर्नर भागात भंगाराचे दुकान आहे. १९ जून रोजी दुकानातील साहित्य जालना येथे पाठविण्यासाठी मोहम्मद अफसर याचा ट्रक भाड्याने घेण्यात आला होता.
परभणी शहरातील नानलपेठ पोलीस हद्दीतील घटना
सदर वाहनात भंगार साहित्य भरण्यात आले. विहित मुदतीत ट्रक चालक भंगार साहित्य घेवून जालना येथे पोहोचला नाही. या बाबत दुकानदाराने ट्रक चालक प्रविण हजारे याला फोन केला असता त्याने ट्रक मालकाने घरीच राहण्याचे सांगितले असून गाडी ते घेवून गेल्याचे सांगितले. (Parbhani Crime) यानंतर फिर्यादीने गाडी मालक आणि त्यांच्या मुलाला फोन केला असता दोघांचाही फोन बंद येत होता. संबंधित दोघांनी विश्वास संपादन करत आठ टन भंगार साहित्य कोठेतरी घेवून पसार झाल्याचे समजल्यावर नानलपेठ पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. मोहम्मद अफसर मोहम्मद इकबाल, मोहम्मद युसूफ या दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.शहरातील (Parbhani Police) नांनलपेट पोलीस अधिक तपास करत आहेत.