परभणी (Parbhani Crime) : गंगाखेड शहरातील (Gangakhed taluka) ज्ञानेश्वर नगरमध्ये अज्ञात चोरट्यांनी घराच्या दाराचे कुलूप तोडून दोन सोन्याच्या अंठ्यांची चोरी करत पळून गेले आहेत. त्या अज्ञात दोघांविरोधात (Gangakhed Police) गंगाखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल
संत ज्ञानेश्वर नगरातील राजकुमार कोंडीबा केंगार यांच्या घराचे दोन अज्ञात चोरट्यांनी मंगळवार ४ जून रोजी घराच्या दाराचे कुलूप तोडले. त्यानंतर घरामध्ये प्रवेश करत कपाट उघडून त्यात ठेवलेल्या प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या ज्याची अंदाजे किंमत जवळपास ५० हजार रुपये आहे त्या चोरून नेल्या. त्या दोन चोरांविरोधात राजकुमार केगार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवार ७ जून रोजी (Gangakhed Police) गंगाखेड पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा पुढील तपास सपोनि. सिंगणवाड करत आहेत.
रात्रीची गस्त वाढवावी
शहरात मागील काही दिवसात दिवसाढवळ्या लुटमार हाणामारी मोटरसायकल चोरी प्रकरण वाढत आहे. (Gangakhed Police)पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेत दिवसा व रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी (Gangakhed taluka) गंगाखेड शहरातील नागरिकाकडून करण्यात येत आहे